Mostly Economics. Business Portal of India. Import export data, Importers Exporters Directory, Export import data. UNION BUDGET & ECONOMIC SURVEY. Milind Thatte on Forests and People. (अनुभव मासिकात जून 13 च्या अंकात प्रसिध्द झालेला लेख) एखादा बिबट्या मनुष्य वस्तीत शिरल्याची बातमी येते, मोठ्या शहरात शिरला तर मोठी बातमी येते आणि लहान गावात शिरला आणि माणसांनी त्याला मारला तर अजूनच मोठी बातमी येते. यालाच माणूस वि. निसर्ग संघर्ष असेही म्हटले जाते. किंवा झाडे तोडू नका, एक तरी झाड लावा, किंवा पक्ष्यांना पाणी पाजा नाहीतर निसर्गाचे काही खरे नाही असेही म्हटले जाते. एकूणच आजकाल माणूस निसर्गाच्या भलताच मागे लागला आहे आणि निसर्गाला वाचवण्याची गरज आहे असे चित्र उभे राहते. माणूस निसर्गाच्या विरोधात जातोय किंवा निसर्ग आणि माणसाचा संघर्ष होतोय ही विधानं मला थोडीशी दर्पोक्तीची वाटतात. अर्थात् निसर्ग हा कोणी सर्वशक्तिमान देव आहे किंवा काहीतरी गूढ गहन परमात्मरूप शक्ती आहे असे माझे म्हणणे नाही.
आदिम काळात माणसाला निसर्गाची भीती वाटत असे. तंत्रज्ञान विकसत गेले तसे निसर्गावर अवलंबून असण्याची जाणीव कमी होत गेली. शहरातल्या मुलांचे ‘भैया दूध देतो’ किंवा ‘साखर रेशन दुकानात पिकते’ हे विनोद याच निसर्गनेणिवेतून तयार झाले आहेत. कष्टमुक्त जगणे हे प्रत्येक जीवाला हवेच असते. मु.